Weather Forecast Maharashtra: राज्यात अजूनही काही भाग कोरडाच; ‘या’ तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Forecast Maharashtra) बरसत आहे तर काही जिल्हे अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिना सुरू होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तरी अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकर्‍यात (Farmers) चिंतेचे वातावरण आहे.

ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ (Weather Expert) माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पावसासाठी (Favorable Condition For Monsoon) अनुकूल वातावरण असून येत्या काही दिवसात अनेक भागात पावसाची शक्यता आहे (Weather Forecast Maharashtra)
               
पावसासाठी सध्या राज्यात अजूनही अनुकूल परिस्थिती कायम आहे. पुढील 4 दिवस म्हणजे शनिवार दि.13 जुलै पर्यंत कोकणात अति जोरदार, विदर्भात जोरदार, तर खानदेश, नाशिक (Nashik), नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते (Weather Forecast Maharashtra)

रविवार 14 जुलै पासून त्यापुढील 4 दिवस म्हणजे गुरूवार दि. 18 जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग,  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता (Weather Forecast Maharashtra) अधिक जाणवते. 

अजून पाच दिवस म्हणजे 15 जुलैपर्यंत बक्कळ ओलीवर अजूनही खरीपाच्या चांगल्या पेरण्या (Kharif Sowing) होवू शकतात. बाठर ओलीवर केलेल्या अति- आगाप पेरण्या केवळ एमजेओच्या प्रणालीतून झालेल्या किरकोळ पावसामुळे कशातरी सध्या तग धरून उभ्या असल्या तरी तो निर्णय अति-घाईचाच होता, असेही आज वाटते. कृषी तज्ज्ञांनी सूचना केली होती की खरीप पेरणीची घाई करू नका परंतु बहुतेक शेतकर्‍यांनी यावेळी पेरणी केली होती. पेरणीसंबंधी तज्ज्ञांनी केलेले आवाहन खरे ठरू पाहत आहे, असे वाटते. 

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.