हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यातील हवामानात अवकाळी वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. कधी ऊन तर कधी अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. मात्र सध्या राज्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र येत्या काही दिवसात पुन्हा पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
आज ता.१६ या दिवशी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या झळा चांगल्याच तापदायक ठरत असल्याने उन्हाळी पिके, ऊस, फळबागा करपू लागल्या आहेत. उकाड्यातही वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असून उष्माघातामुळे जिवीतहानी वाढण्याचे शक्यता आहे.
तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले १ मिनिटांत चेक
शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.
येत्या या दिवसात अवकाळी पाऊस होणार (Weather Update)
सध्या उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात असून काही दिवसांनी मान्सून होणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढणी करून इतर कमला लागावे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. येत्या २२, २३, २४, २५ मे या तारखेला पूर्व मान्सून राज्यात हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.