Weather Update : आज (दि. १८) कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. दि. १९ जुलैपर्यंत आणखी एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात या दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
दुबार पेरणीचे संकट
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पाऊस पडत नसल्यामुळे चिंतेत आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पेरणी केलेली पिके पावसा अभावी जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र पैकी फक्त दीड लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
धरण क्षेत्रात मोठे पावसाची गरज (Weather Update)
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. या धरणामध्ये २४ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे
इंदापूर (जि. पुणे) जवळील उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे धरणाने तळ गाठला आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसला तरी तापी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १५ ते १६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकरी सध्या स्पिंकलर चा वापर करत आहेत.
Latest satellite obs at 10.10 pm pic.twitter.com/rrSjXunKZz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2023
महाराष्ट्रात आज कोणत्या भागात किती पाऊस होणार?
अति जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (ऑरेंज अलर्ट) : पुणे
जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (येलो अलर्ट) : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (यलो अलर्ट) : नांदेड, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर.