हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस महाराष्ट्राची पाठ सोडत नाही. मागील मार्च महिन्याच्या पंधरवड्यात पावसाने अहाकार माजवला. काल देखील विदर्भात पावसाचे वातावरण पहायला मिळत होते. आज (ता.६) या दिवशी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात तापमानात चढ – उतार (Up – Down) पहायला मिळाला. मात्र आज मध्य मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) दिली.
कोकण भाग वगळता काल (ता.५) या दिवशी राज्यातील इतर जिल्ह्यात ३४ ते ३९ तापमान होते. विदर्भात ४० अंश सेल्सिअस तापमान होते. तर सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम येथे ३९ अंश तर उद्या (ता. ७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या अंदाजाचे नेमके करण पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.
तुमच्या गावात पाऊस पडणार काय?
या कारणामुळे विदर्भ आणि मध्य मराठवाड्यात पावसाची शक्यता
छत्तीसगड पासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूतील काही भाग हा समुद्रापासून ९०० मिटर हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि खंडीत वाऱ्याची स्थिती कायम पहायला मिळते. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात आज (ता.६) या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात पावसाची दाट संभावना दिसते. तर उद्या (ता.७) याच भागात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.