Weather Update : ‘या’ राज्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस; गहू पिकाला फायदा!

Weather Update Heavy Rain In Punjab
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ३१ जानेवारी २०२४ रोजी हवामान विभागाकडून (Weather Update) उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार मागील तीन ते चार दिवसांपासून या भागामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पंजाब या आघाडीच्या गहू उत्पादक राज्यामध्ये चांगला अवकाळी पाऊस बरसला आहे. ज्यामुळे तेथील गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. याशिवाय राजधानी दिल्लीसह चंडीगढ़मध्येही पावसाने हजेरी लावली आहे. तर जम्मू-काश्मीर, श्रीनगरच्या अनेक भागांतील रस्त्यांवर बर्फवृष्टीमुळे ५ इंचापर्यत बर्फाचा थर (Weather Update) जमा झाल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

पंजाबमध्ये दमदार पाऊस (Weather Update Heavy Rain In Punjab)

पंजाबमध्ये यावर्षी ३४ लाख हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. त्यामुळे सध्या झालेल्या या पावसामुळे (Weather Update) या गहू पिकाला मोठा फायदा झाला आहे. मागील तीन दिवसांपासून पंजाबमधील मोहाली, फतेहगढ साहेब आणि लुधियाना या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. उपलब्ध माहितीनुसार, लुधियाना जिल्ह्यात 37 मिमी, फतेहगढ साहेब जिल्ह्यात 28 मिमी आणि मोहाली 25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पंजाब कृषी विभागाच्या माहितीनुसार, या अवकाळी पावसाच्या पिकांना फारसा फटका बसला नसून, झालेला पावसामुळे गहू पिकाला फायदा झाला आहे. दरम्यान, पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये आणखी दोन दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गहू पिकाला फायदा

उत्तरेकडील राज्यांमधील मुख्यतः पंजाबमधील गहू पीक हे सध्या 70 ते 90 दिवसांचे आहे. सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला पावसाची गरज होती. अशातच या भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय या पावसामुळे पुढील काही दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. त्याचाही गहू पिकाला फायदा होणार असून, उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. असे लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाने म्हटले आहे.

दोन दिवस पावसाची शक्यता कायम

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पंजाब, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. तर राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या काही भागांमध्ये रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच केरळच्या काही भागांमध्येही या काळात हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.