हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने डिजिटलायझेशन कडे पाऊल उचलत ई -पीक पाहणी ही मोबाईल ऍप लॉन्च केले आहे. यामध्ये पीकपेऱ्याची तसेच इतर महत्वाच्या नोंदी करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत अवधी दिला होता. मात्र आता ही मुदत वाढवून १५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या प्रत्येक गावागावात या ई -पीक पाहणी संदर्भात चर्चा रंगल्या आहेत. मात्र ई -पीक पाहणी म्हणजे नक्की काय ? त्याचे फायदे तोटे काय आहेत याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया…
पीक पेऱ्यासह इतरही नोंदी
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे. ‘ई-पीक पाहणी’टचे हे पहिलेच वर्ष आहे. असे असतानाही सर्व शेतकऱ्यांना समावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकसान भरपाईची तक्रार नोंदवण्यासाठी ‘फार्मामित्र’ हे अॅप आहे तर पिक पेऱ्याची माहिती नोंदवण्यासाठी ई-पीक पाहणी हे अॅप आहे.
ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे
1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी’बाबत त्रुटी
1) ‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही.
2) अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नाही. अॅपमध्ये नेमकी माहिती भरायची कशी हेच शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करी आहेत.
3) यंदा अशाप्रकारे माहिती भरुन घेतली जात आहे. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार हे स्पष्ट नाही.
संदर्भ – टीव्ही ९