Yellow Mosaic Virus In Soybean: असे करा सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचे नियंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या सोयाबीन पि‍कावर हानिकारक पिवळा मोझॅक (Yellow Mosaic Virus In Soybean) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. या विषाणूजन्य रोगाचा (Viral Disease) प्रसार पांढऱ्या माशीमुळे (White Fly) होतो.

पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या (Yellow Mosaic Virus In Soybean) पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात. 

हा रोग सोयाबीन पिकाची(Soybean Crop) वाढ, फुलोरा आणि शेंगा धरणीच्या काळात फोफावत असल्याने या रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जाणून घेऊ या रोगाच्या नियंत्रणाचे उपाय.

नियंत्रण उपाय (Control Measures Of Yellow Mosaic Virus In Soybean)

  • शेतातील अतिरिक्त पाणी काढून वाफसा स्थिती निर्माण करावी.
  • वाफसा आल्यावर पीक 30 ते 35 दिवसाचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.
  • पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतात प्रति हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे (Yellow Sticky Traps) लावावेत.
  • सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
  • सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या (Yellow Mosaic Virus In Soybean) व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.