खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची तात्काळ मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. नुकताच त्यांनी विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झाली विशेषतः मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान त्यात झाले. पण म्हणावी तशी हालचाल म्हणावी तशी मदत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. मी सुरवातीला गडचिरोली तसेच तिथल्या आणि बीड लातूर उस्मानाबाद या भागाला प्रत्यक्ष भेटी दिल्या विशेषत: बीडमध्ये गोगलगायींचें आक्रमण सोयाबीन पिकावर झाले आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी दौरे केले. ही बाब त्यांनी केंद्राच्या कानावर घालायला हवी होती मात्र तसे झाले नाही. केंद्राची टीम पाहणीसाठी यायला पहावी होती. पण तसे झाले नाही.

जमिनी खरडून गेल्यात

आत्ताच्या घडीला १० लाख हेक्टर क्षेत्र पूर परिस्थितीमुळे बाधित झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना काळात नाहीये की, आता पुढे काय करायचं ? करणं खरीप हंगाम निघून गेला आहे. कृषी विभागाने तात्काळ यात लक्ष घातलं पाहिजे. सरकारने लक्ष घातलं पाहिजे. सरकारने तशा सूचना दिल्या पाहिजेत. पंचनामे सगळीकडेच १०० टक्के झाले नाहीत. काही ठिकाणी तातडीची मदत मिळायला हवी होती ती मिळाली. मात्र काही ठिकाणी मदत मिळायला हवी होती ती नाही मिळाली. या काळात ११० जणांना अतिवृष्टीमुळे प्राण गमवावे लागले. त्यांच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली काही ठिकाणी मदत पोहचली मात्र ही मदत सध्याच्या घडीला तुटपुंजी आहे ती वाढवण्यात यावी अशी आमची मागणी आहे असे पवार म्हणाले.

पशुधनाची मदत नाहीच

अनेक शेतकऱ्यांनी आपली पशुधन पुरात गमावले आहे. त्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही. ही मदत सुद्धा तातडीने देणे गरजेचे आहे. या संदर्भातले प्रस्ताव अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे मात्र सरकारने यात लक्ष घालून तातडीने मदत देणे गरजेचे आहे. असे पवार म्हणाले. सोयाबीन, कपास, तूर याचे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. केली बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

खरीप नुकसानीसाठी मदत द्यावी

खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे सत्कार स्विकारण्यापेक्षा आता मदतीकडेही लक्ष द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.पूरग्रस्तांना मदत करणे गरजेचे असताना राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व्यस्त आहेत. असा टोमणा पवार यांनी लगावला. नुकसानीची दाहकता पाहता आतापर्यंत पंचनामे प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्रीच नसल्याने नेमके चित्र काय हेच समोर येत नाही. असे पवार यांनी म्हंटले आहे.