हरभऱ्याला मिळतोय कमाल 6000 रुपयांचा भाव ; पहा आजचे हरभरा बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो रब्बीतील हरभरा आता काढणीच्या अवस्थेत आला आहे. त्यामुळे हळूहळू हरभरा आता बाजार समित्यांमध्ये दाखल होऊ लागला आहे. मात्र सध्याचे बाजारभाव बघता हरभऱ्याला म्हणावा तसा दर मिळत नाही. हरभरा चे सर्वसाधारण दर हे चार हजार ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे काढलेला हरभरा अद्यापही साठवणुकीला शेतकरी प्राधान्य देत आहेत.

आजचा हरभरा बाजार भाव बघता आज सर्वाधिक पुणे इथं त्याचबरोबर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला ६००० रुपयांचा कमाल दर मिळाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हरभऱ्याची अकराशे सात क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5500 कमाल भाव सहा हजार रुपये ,तर सर्वसाधारण भाव पाच हजार आठशे रुपये इतका मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकतीस क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली. याकरिता किमान भाव 5500, कमाल सहा हजार रुपये तर सर्वसाधारण भाव 5750 इतका मिळाला आहे. सध्यातरी पहिल्या पेऱ्यातील हरभरा हा बाजारामध्ये विक्रीसाठी आणला जातोय . मात्र अद्यापही काही जणांचा हरभरा हा शेतातच असून अद्यापही त्याची काढणी प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे हळूहळू बाजारात हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रात हरभऱ्याचा मोठा पेरा झाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 17-2-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/02/2022
शहादाक्विंटल633370064464850
पुणेक्विंटल31550060005750
दोंडाईचाक्विंटल128445054964561
माजलगावक्विंटल102386047254450
राहूरी -वांबोरीक्विंटल4456145614561
उदगीरक्विंटल705455047004635
हिंगोलीक्विंटल100430047164508
कारंजाक्विंटल80400046054245
मोर्शीक्विंटल53380040003900
राहताक्विंटल11455046214585
जळगावचाफाक्विंटल55370045504500
चिखलीचाफाक्विंटल101380045254162
सोलापूरगरडाक्विंटल203440045804560
औरंगाबादगरडाक्विंटल3350046004050
मालेगावकाट्याक्विंटल17322660004450
तुळजापूरकाट्याक्विंटल80450045004500
नागपूरलालक्विंटल272410047304573
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल5410045004500
तेल्हारालालक्विंटल150422547004530
उमरीलालक्विंटल24440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल120470049004800
जालनालोकलक्विंटल478370047514500
अकोलालोकलक्विंटल233390049404550
लासलगावलोकलक्विंटल7390045754551
लासलगाव – विंचूरलोकलक्विंटल7446144994470
मुंबईलोकलक्विंटल1107550060005800
वणीलोकलक्विंटल9301043054000
कोपरगावलोकलक्विंटल16400046404520
गेवराईलोकलक्विंटल10350041513600
देउळगाव राजालोकलक्विंटल7400040004000
मेहकरलोकलक्विंटल75400046504300
तळोदालोकलक्विंटल3450059025500
यावललोकलक्विंटल15490055505350
नांदगावलोकलक्विंटल3399945504351
कुर्डवाडी-मोडनिंबलोकलक्विंटल11445145304500
लोहालोकलक्विंटल30461746714620
पाथरीलोकलक्विंटल12340044003501
मंगरुळपीरलोकलक्विंटल75368046504250
मंगळूरपीर – शेलूबाजारलोकलक्विंटल64360045004250
ताडकळसनं. १क्विंटल18450046114511
गंगाखेडपिवळाक्विंटल5450046004500