देशातील ‘या’ भागात पावसाची शक्यता ; पहा कसे असेल राज्यातील वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसून येते आहे. शिवाय राज्यातल्या काही भागात ढगाळ वातावरणही होत आहे. हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक ३ मार्च रोजी विदर्भ तसेच संलग्न मराठवाड्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. येत्या तीन ते चार तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांत सोसाट्याचा वारा, वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

देशातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

या आठवड्यात हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार, भारतीय हवामान विभागाने (IMD) पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात ३ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 6 मार्च ते 8 मार्चपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज आणि उद्या रात्रीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण दक्षिण भारताबद्दल बोललो तर, भारतीय हवामान खात्याच्या ट्विटनुसार, “03 ते 05 मार्च दरम्यान, तमिळनाडू-पुडुचेरी-कराईकलमध्ये मुसळधार पावसासह 04 मार्चला देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे 04 आणि 05 मार्च रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान आज दिनांक 3 रोजी पुण्यातील हवेली इथं सर्वात कमी 14.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईतील कुलाबा इथं 22.5 आणि सांताक्रुज इथं 22.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.