हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळते आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. नगर, चंद्रपूर, सांताक्रुज ,मालेगाव या ठिकाणी तापमान 37 अंशांपर्यंत पर्यंत पोहचाले आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरण्याचा ठरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
या भागात पाऊस
आज पासून तमिळनाडूमधील किनारपट्टीचा भाग, पुदुच्चेरी ,कराईकल मध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू आंध्र प्रदेश या किनार्याजवळ समुद्रात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही पावसाला पोषक हवामान होत असून ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. सोमवारपासून म्हणजेच दिनांक सात मार्चपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सातत्याने 34 ते 37 अंश यापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी दिनांक चार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नगरीत उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंद केला आहे.शिवाजीनगर येथे 34 .4, सांताक्रुज इतर 37.1 तर मालेगाव इतर 37 आणि चंद्रपूर येथे येथील 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान खालीलप्रमाणे (4 मार्च )
सांताक्रूझ मुंबई 36.7, रत्नागिरी 36.6, सोलापूर 36.5, सांगली 36.1, मालेगाव 37.4, पुणे 35, परभणी 35.9, नांदेड 36.2, बाकी ठिकाणी तापमान हे 33 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याचे नोंद करण्यात आले आहे.