अलर्ट …! मुंबईसह राज्यातील ‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

heat wave
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता मुंबईसह कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 व 15 मार्च रोजी मुंबई ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 15 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दक्षिण कोकणात दिला आहे. तर दिनांक 16 मार्च रोजी संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन देखील आय एम डी ने केले आहे.

या भागात उष्णतेची लाट
सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागांमध्ये भीषण उष्णता निर्माण झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून किनारपट्टी सह मुंबई आणि गोव्याच्या काही भागांमध्ये उष्णते मध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये सौराष्ट्र कच्छ च्या काही भागांमध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, राजस्थानच्या पश्‍चिम भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील या भागाला अलर्ट
आज मंगळवार दिनांक 15 मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या भागांसाठी तीव्र उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात भूषण त्याच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यातील किमान तापमानात वाढ
याच बरोबर हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 रोजी पुण्यातील राजगुरुनगर येथे 14.3 किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याशिवाय हवेली इथं 14.5 शिवाजीनगर 14.5 14.8 पाषाण 14.8 बारामती 15.8 तळेगाव 16.5 माळीन 17 इंदापूर 17 दौंड 17.1 अशी नोंद किमान तापमानाची पुण्यामध्ये आज करण्यात आली आहे.

या गोष्टींचे पालन करा

— मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या असा आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.

— शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतात जात असाल तर भर दुपारी शेतामध्ये काम करू नका. शक्यतो सकाळी आणि चार नंतर शेतातली कामं करून घ्या.

— सावलीमध्ये रहा

— भरपूर पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका.

–दुपारी गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा गरमी पासून वाचण्यासाठी स्कार्फ रुमाल यांचा वापर करा.

— द्रवरूप पदार्थांचे जास्त सेवन करा.