सोयाबीनच्या दरात वाढ…! हंगाम संपताना शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजार भाव राहता सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमाल भाव सात हजार चारशे रुपये मिळाला आहे. सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा होती. आता हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचे भाव स्थिर आहेत.

आज दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सोयाबीनला सर्वाधिक कमाल 7510 रुपयांचा भाव मिळाला. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पिवळ्या सोयाबीनला मिळाला असून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीनची पंधराशे 47 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 6600 कमाल भाव 7510 आणि सर्वसाधारण भाव सात हजार पंधरा रुपये का मिळाला आहे. त्याखालोखाल देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला. गंगाखेड ,जालना आणि वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

दिनांक 25 मार्च रोजी मिळालेल्या बाजारभावाच्या तुलनेत आज दिनांक 26 मार्च रोजी मिळालेले भाव हे अधिक आहेत. सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हे बाजार भाव सात हजारांवर स्थिरावलेले दिसत आहेत. त्यामुळे त्याच दरात विक्री करावी की अजून वाढीव दराची वाट पहावी या संभ्रमात सध्या शेतकरी राजा आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीचा निर्णय घेतला आहे. आता खरिपाची लगबग लवकरच सुरू होईल असं असताना शेतकऱ्यांनी वाढीव दरासाठी काय पण अशी भूमिका घेतली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/03/2022
औरंगाबादक्विंटल15680069006850
माजलगावक्विंटल169550070616900
राहूरी -वांबोरीक्विंटल6690070006950
उदगीरक्विंटल2800730073307315
परळी-वैजनाथक्विंटल700685173417151
लोहाक्विंटल67700072117150
राहताक्विंटल7708672007151
सोलापूरलोकलक्विंटल72690072507100
अमरावतीलोकलक्विंटल2257680072517025
नागपूरलोकलक्विंटल122580073026925
कोपरगावलोकलक्विंटल109670073777275
वडूजपांढराक्विंटल50720074007300
लातूरपिवळाक्विंटल8231650074217320
जालनापिवळाक्विंटल1684650074007250
अकोलापिवळाक्विंटल883550071856500
आर्वीपिवळाक्विंटल140610073006900
हिंगणघाटपिवळाक्विंटल1547660075107015
बीडपिवळाक्विंटल108630072006930
भोकरपिवळाक्विंटल59590071536526
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल194680070006900
मलकापूरपिवळाक्विंटल258600072657100
गंगाखेडपिवळाक्विंटल41720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल15680070917000
मुरुमपिवळाक्विंटल180650171016801
पालमपिवळाक्विंटल12715171517151
उमरखेडपिवळाक्विंटल50620064006300
देवणीपिवळाक्विंटल71735075007425