वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता ; वावरातल्या पिकांची घ्या काळजी , वाचा तज्ञांचा सल्ला

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 05 एप्रिल रोजी उसमानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज दिनांक 05 एप्रिल रोजी उसमानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करूण साठवणूक करावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या करडई पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या करडई पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे केळी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. आंबा फळबागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 5 ग्रॅम तसेच 13:00:45 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी