लोकल चणा पोहचला कमाल 5700 रुपयांवर ; पहा आजचा हरभरा बाजारभाव

hrbhra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदा हरभऱ्याचा मोठा पेरा राज्यामध्ये झाला आहे. मात्र म्हणावा तसा दर सद्या राज्यामध्ये हरभऱ्याला मिळताना दिसून येत नाही. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांप्रमाणे हरभऱ्यालाही चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान आजचे बाजार भाव बघता हरभऱ्याला कमाल पाच हजार 700 रुपयांचा दर मिळालेला दिसून येत आहे. हरभऱ्याचे दर काही बाजार समित्यांमध्ये वाढलेले दिसून येत आहेत मात्र काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर हे पाच हजार रुपयांच्या आत असल्याचे दिसून येत आहे. नाफेडवर हरभऱ्याला ५२३० रुपये दर प्रति क्विंटलला निश्चित करण्यात आला आहे. त्यातुलनेत खुल्या बाजारात दर मी मिळत असले तरी हळूहळू काही बाजार समित्यांमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानावी लागेल.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज पुणे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती इथं हरभऱ्याला कमाल दर पाच हजार 700 रुपये इतका मिळाला आहे. तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायब्रीड हरभरा ला सहा हजार 800 रुपयांचा दर मिळाला. तर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायब्रीड चण्याला सहा हजार 795 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चणाला 7750 रुपयांचा कमाल भाव मिळाला. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची केवळ 11 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 6500, कमाल भाव 7750 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण आणि कमाल भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2022
पुणेक्विंटल33540057005550
सिन्नरक्विंटल97350545654305
पैठणक्विंटल6397644804376
चाळीसगावक्विंटल70400044064310
कारंजाक्विंटल4500427545804410
शिरुरक्विंटल6670069506950
राहताक्विंटल19449045404515
जळगावचाफाक्विंटल122430045504500
चिखलीचाफाक्विंटल1050420045114355
मलकापूरचाफाक्विंटल700410046754421
दर्यापूरचाफाक्विंटल2500445048604700
सोलापूरगरडाक्विंटल297400046754550
कल्याणहायब्रीडक्विंटल3550068006150
धरणगावहायब्रीडक्विंटल39440067954560
जळगावकाबुलीक्विंटल11650077506500
तुळजापूरकाट्याक्विंटल65450045004500
जिंतूरलालक्विंटल165440045214450
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल4430045004300
उमरखेडलालक्विंटल400440045004450
लाखंदूरलालक्विंटल24445045004475
अकोलालोकलक्विंटल3597400048304600
अमरावतीलोकलक्विंटल8584440047504575
नागपूरलोकलक्विंटल8902420046264520
मुंबईलोकलक्विंटल2023520057005500
परतूरलोकलक्विंटल78447046004525
देउळगाव राजालोकलक्विंटल100430044504400
मेहकरलोकलक्विंटल900400046004350
काटोललोकलक्विंटल449400045404350
देवळालोकलक्विंटल1470047004700
देवणीलोकलक्विंटल27459047054647
शिरुरनं. २क्विंटल2450046004600
गंगाखेडपिवळाक्विंटल3440045004400