हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या काही भागात उन्हाचा चटका कायम असून दुपारनंतर ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. गहू , मका,हळद अशा पिकांची काढणीची कामे सध्या शेतकरी अवकाळीचा धास्तीने उरकून घेत आहेत. दरम्यान आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज भारतीय हवामान खात्याकडून मान्सून २०२२ विषयी माहिती सांगितली जाणार आहे. आज दुपारी १२ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही माहिती सांगितली जाईल.
तर दुसरीकडे राज्यातील विदर्भ ,मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र भागात उन्हाचा चटका कायम असून काल दिनांक १३ रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर , कोल्हापूर ,साताऱ्याचा काही भाग आणि कोकणातही अवकाळी पावसाने काल हजेरी लावली. तर भारतीय हवामान खात्याकडून तामिळनाडू ,केरळ ,आसाम ,मेघालय, अरुणाचल प्रदेश ,पुद्दुचेरी या भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.
कुठे किती तापमान ?
बुधवारी दिनांक १३ रोजी नोंदवण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे : पुणे ३८.१, नगर ४२.४, धुळे ४०.४, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३२.६, नाशिक ३८.५, निफाड ३९.६, सांगली ३७.१, सातारा ३८.५, सोलापूर ४०.४, सांताक्रूझ ३५.४, डहाणू ३३.१, रत्नागिरी ३३.५, औरंगाबाद ४०.२, नांदेड ४१, परभणी ४१, अकोला ४३, अमरावती ४१.८, बुलडाणा ४०.३, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ४१, नागपूर ४०.५, वर्धा ४२.२, वाशीम ४०.५, यवतमाळ ४१.५.