हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद आज (१६) पुण्यामध्ये पार पडली. यावेळी शेतऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सध्या राज्यामध्ये चालू असलेले भारनियमन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. विजेचे वाटप करत असताना पक्षपातीपणा होतो अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अशी शेती करायची कशी ?
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सध्याच्या भारनियमनाचा सर्वाधिक फटका हा क्षेत्री क्षेत्रालाच बसला आहे. खरंतर विज ही नैसर्गिक घटकांपासून तयार होते. त्यावर सर्वांचा अधिकार आहे. मात्र विजेचे वाटप करत असताना पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप आज पुण्यामध्ये बोलताना स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. आज शेती क्षेत्र सोडलं तर इतर घटकांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली जाते मात्र शेतकऱ्यांना रात्रीचे केवळ आठ तास विजेचे उपलब्ध करून दिली जाते. शिवाय सध्या कोळशाची कपात असल्याचा कारण दाखवून आहे त्या आठ तासातील आणखी कमी करून केवळ साडेतीन ते चार तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाते. अशा उन्हाळ्यामध्ये साडेतीन तासामध्ये शेती कशी करायची? याचे उत्तर ऊर्जामंत्री यांनी आम्हाला द्यावे असा सवाल सुद्धा राजू शेट्टी यांनी केला.
भारनियमन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश
सध्याचे लोडशेडिंग हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. कोळसा उपलब्ध झाला नाही तर तो का झाला नाही याची कारणं शोधली गेली पाहिजे होती शिवाय आयातिचाही पर्याय होता तो का झाला नाही ? असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. शेतकऱ्यांकडून वीज कनेक्शन कट करून डीपी बंद करून महावितरणने सक्तीची दहा हजार कोटींची वसुली मार्चच्या आधी करून घेतली. आता जर शेतकऱ्यांना गरज असताना तुम्ही वीज देत नसाल तर शेतकऱ्यांनी तुमच्या बिलाचे पैसे का भरावेत? असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. आत्ताची वीज येते ती थोड्या थोड्या अंतराने येते म्हणजे पंधरा मिनिटात विजे येते पुन्हा १५ मिनिट बंद होते आणि पुन्हा थोड्या वेळानं विज येते अशा पद्धतीने वीज येत असेल तर पाणी पाटातच जातंय.. पाणी पुढे सरकतच नाही.. कशी शेती करायची? असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले , लवकरच २ याचिका दाखल करीत आहोत एक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. त्याकरिता देता गोळकरण्याचे काम सुरु आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे किमान हमी भाव वेतन कायदा हा शेतकऱ्यांना संसदेने लागू करावा अशा मागण्या घेऊन राष्ट्रपतींची देखील भेट घेतली जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.