सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवले ; बघा राज्यातल्या कापूस दरावर काय झाला परिणाम ? पहा बाजारभाव

cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो हंगामात कोणत्या शेतमालाला सर्वाधिक चांगला दर मिळाला आहे तर तो कापसाला मिळाला आहे. या हंगामात कापसाने रेकॉर्डब्रेक दर मिळवला. कापसाचे कमाल दर राज्यात १३ हजार रुपयांपर्यंत राहिले. मात्र आता केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जरी चांगला असला तरी त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ? याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.

अशातच सध्याचे राज्यातील बाजारभाव पाहता सरकारच्या या निर्णयाचा अद्यापतरी बाजारभावावर काही परिणाम झालेला दिसून येत नाही कारण मागील २ -३ दिवसांचे राज्यातील कापूस बाजारभाव बघता कापसाला राज्यात कमाल भाव १२५०० रुपयांपर्यंत मिळत आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला कमाल बारा हजार पाचशे पन्नास रुपयांचा कमाल भाव मिळाला. दिनांक 15 रोजी कापसाला 12 हजार 500 रुपयांचा कमाल भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसासाठी मिळाला तर आज दिनांक सोळा एप्रिल रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव कापसाला 12 हजार 500 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. हा भाव मध्यम स्टेपल कापसासाठी मिळाला आहे. त्यामुळे सध्या तरी कापसाच्या दरावर कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही. मात्र भविष्यात कापूस दरावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

ताजे कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/04/2022
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल120085001250010050
15/04/2022
सावनेरक्विंटल2500106001150011100
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल5468850117009745
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल105085001250010100
14/04/2022
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल9358900117009865
13/04/2022
अमरावतीक्विंटल24590001210010550
सावनेरक्विंटल2500107001150011200
समुद्रपूरक्विंटल1538000124009800
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल72105001220011500
जामनेरहायब्रीडक्विंटल24100001200011570
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल47191501170010021
मनवतलोकलक्विंटल350093001230012160
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल25092001220012000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल381285001255010020
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल25085001250010000
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल2798001160010700
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल208119061190611906