दिलासादायक…! राज्यात नाफेड तर्फे कांदा खरेदी सुरू ; 20 लाख टन कांद्याची होणार खरेदी

Onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही ठिकाणी तर कांदा विकण्यापेक्षा फेकलेला बरा कारण विकून केलेला खर्चही मिळत नाही अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नाफेड कडून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

कांद्याचे दर घसरल्यामुळे नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती.अनिल घनवट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली होती व त्यासंबंधीचे निवेदन दिले होते. त्याला आता यश आले असुन मंगळवारपासून (दि १९) महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली आहे.

२० लाख टन कांद्याची होणार खरेदी

यावर्षी नाफेड मार्फत गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जवळजवळ अडीच लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे. यामध्ये मूल्य स्थिरीकरण निधी च्या माध्यमातून किमान पंधरा रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सध्या जो कांद्याचा बाजार भाव चालू आहे त्या दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दोन लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत 50 हजार टन कांदा अधिक खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली.

किती आहे दर ?

सध्या जो कांद्याचा बाजार भाव चालू आहे त्या दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला असून या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.या खरेदी करण्यात आलेल्या कांद्याची खरेदी तसेच साठवणूक करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरप्रकार होऊ नये त्यामुळे स्वतंत्र भारत पार्टी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत.