आळीमिळी गुपचिळी…! विरोधक इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत : राजू शेट्टी

Raju Shetti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभरात ‘बळीराजा हुंकार’ यात्रेला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस गाळप अद्याप शिल्लक आहे महा पूरग्रस्तांना तोकडी मदत दिली गेली आहे. सत्ताधारी मात्र वादांमध्ये मश्गुल आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे ते बारामती इथं बोलत होते.

एकूणच आळीमिळी गुपचिळी
दरम्यान पुढे बोलताना विरोधक आणि राज्यकर्ते देखील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गप्पा आहेत मात्र राज्यात वेगळेच राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोनाच्या काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. आरोग्य म्हाडा पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांचाही मोठे नुकसान झाले आहे. असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत मात्र विरोधक इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत तर केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत तर राज्यातल्या प्रश्नावर येथे विरोधक गप्प आहेत एकूणच आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान महा विकास आघाडी सरकारवर देखील राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार साहेब दहा वर्ष कृषिमंत्री होते त्यांनी याबाबत योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. या ऊस उत्पादकांमुळे त्यांच्या पुतण्या आणि नातवंडांचे कारखाने झाले असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शिवाय भारनियमन वीज टंचाईला कोळसा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे मात्र हे कारण तकलादू आहे खरंच जर केंद्र सरकार अन्याय करत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर पणे आपली भूमिका मांडली पाहिजे असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

म्हणून महाविकास आघाडीतून बाजूला

दरम्यान महाविकासआघाडी तून बाजूला व्हायचा निर्णय का घेतला याचं कारण देखील राजू शेट्टी यांनी सांगितलं 11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. विविध प्रश्न त्यामध्ये मांडले होते. सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता तसाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र लिहिलं होतं शेतकऱ्यांवर अन्याय कारक निर्णय घेतले मात्र कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळेच कार्यकारिणी शी बोलून मी महाविकास आघाडी तुन बाजूला व्हायचा निर्णय घेतला असं राजू शेट्टी म्हणाले.

उसाचा दर आता परवडत नाही
दरम्यान केंद्र सरकारवर देखील राजू शेट्टी यांनी टीका केली केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांचे दर वाढले, इंधनाचे दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढल्यास त्यांना मागे 214 रुपये खर्च वाढल्याने उसाचा दर आता परवडत नाही. असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे. शिवाय ज्यांनी आठशे शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या त्यांच्यासोबत कसे जाणार असा सवालही त्यांनी केला.