उष्ण ,दमट वातावरणात ‘या’ चारापिकाची लागवड ठरते फायदेशीर ; जाणून घ्या

Ricebean Cultivation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रानो आपल्याकडे ठरविक पिके ही चार पिके म्हणून लागवड केली जातात. यात प्रामुख्याने मका, ज्वारी यांचा समावेश असतो मात्र चाऱ्याच्याही विविध जाती आहेत. या चाऱ्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याची लागवड करणे फायदेशीर ठरते. राइसबीनचा वापर चारा म्हणून केला जाऊ शकतो. जनावरांच्या वाढीसाठी उपयुक्त असे हे चवळीप्रमाणे दिसणारे द्विदल वर्गातील पीक आहे.

मेघालय, ओरिसा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे पिक कडधान्य आणि चाऱ्यासाठी घेतले जाते. भातपिकानंतर हे पिक कडधान्य म्हणून घेतले जाते. म्हणून त्यास राईसबिन म्हटले जाते. कोकण राईसबिन-१ ही हिरव्या चाऱ्यासाठी खरीप हंगामासाठी विकसित केलेली जात आहे. ज्या भागातील वातावरण उष्ण व दमट आहे, अशा भागात आपण या चाऱ्याची लागवड करू शकतो.

कोकण राईसबिन-१ बाबत महत्वाच्या बाबी

–कोकण राईसबिन-१ ही जात चवळी प्रमाणेच पौष्टिक असल्याचे दिसून आले आहे.
–या जातीमध्ये १८.३७ टक्के प्रथिने, १.४५ टक्के स्निग्ध पदार्थ, ४२.८६ टक्के पिष्टमय पदार्थ आढळून येतात.
–या जातीचा चारा गुरे आवडीने खातात .
–साधारणपणे खरीप हंगामात ७५ ते ८० दिवसांमध्ये हेक्टरी २० ते २२ टन चाऱ्याचे उत्पादन मिळते.
–रब्बी हंगामामध्ये जास्त वाढ होत नाही.
–ही जात कडधान्य म्हणून रब्बी हंगामात घेतल्यास हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.