Kharif Sowing 2022 : खरीप सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि ऊस पिकांच्या पेरणीबाबत कृषी तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला ; जाणून घ्या

kharif 2022
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जून महिना कोरडाच गेल्यानंतर जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने दमदार (Kharif Sowing 2022) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. अशातच पावसाचे गणित बिघडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरण्यांसंदर्भांत गोंधळ आहे. मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

सोयाबीन आणि ज्वारी

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून संकरित खरीप (Kharif Sowing 2022) ज्वारी पिकाची पेरणी करावी. संकरित खरीप ज्वारी पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते.

बाजरी आणि ऊस

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी ऊस पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी हळद पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भुईमूग, मुग, उडीद

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील ओलावा बधून वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच खरीप (Kharif Sowing 2022) पिकांची पेरणी करावी. 8 जूलै नंतर भुईमूग, मुग, उडीद हि पिके घेऊ नये.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी