हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे (Weather Update) . आज दिनांक 13 रोजी कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक नद्यांना पूर आलाय वस्त्या गाव पाण्याखाली गेली आहेत. अनेक भागातील शेती देखील पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचाही नुकसान झालं आहे.
हवामानाची स्थिती
ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या (Weather Update) मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे. तर पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. पावसाला पोषक प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे.
या भागाला अलर्ट
राज्यातील पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच जळगाव, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. केवळ आजच नाही तर पुढचे चार दिवस सुद्धा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या (Weather Update) घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.