Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण घाटमाथ्यासह राज्यातील इतर भागातला पाऊस (Weather Update) सध्या ओसरला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १८ जुलै रोजी पूर्व विदर्भ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, उत्तर महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचाही शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

सद्य हवामान स्थिती

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र (Weather Update) कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आदी पूरक प्रणालीमुळे राज्यात चांगला पाऊस झाला. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला.

ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

आज दिनांक 18 रोजी गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे तर कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर,नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी पुढच्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो तसंच येत्या दोन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.