हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या पावसाचा (Weather Update) जोर कमी झाला असला तरी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात आहे. विदर्भात मात्र मागचे २४ तास पाऊस ठाण मांडून आहे. तर राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात कसे असेल हवामान ?
त्यामुळे कोकणात चांगल्या तर उत्तर महाराष्ट्रात धुळे व जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात चांगल्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम, मध्य व पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यताआहे. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपात तर इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. याप्रकारचे हवामान ३० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात देखील काही भागांत आकाश पूर्णतः ढगाळ राहणे शक्य आहे.
सद्य हवामानात शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी ?
मध्यंतरी झालेल्या जोरदार आणि संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे नुकसान झाले आहे. सध्याच्या हवामानानुसार तज्ञांनी सुचविलेल्या सल्ल्या नुसार शेतात साचलेल्या पाण्याचा (Weather Update) निचरा उताराकडील बांधाच्या एका कोपऱ्यातून करावा. योग्य वाफसा येताच सोयाबीन, घेवडा, तूर, भुईमूग, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांच्या पेरण्या कराव्यात. आडसाली ऊस लागवडीची कामे पूर्ण करावीत. जमिनीत वाफसा येताच कोळपणी करून घ्यावी.