Weather Update : घाटमाथ्यावर जोरदार तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता

Heavy Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मान्सून सक्रिय असून अनेक भागात मुसळधार पाऊस (Weather Update) पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर उर्वरित राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय राज्यात पाऊस ओसरण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्रापासून उत्तर बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रापासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य प्रदेशात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र कायम आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्र ओसरल्यानंतर, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले (Weather Update) आहे. तर दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला.

आज या भागाला यलो अलर्ट

आज (ता. १२) कोकणातील रायगड, रत्नागिरी. पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा (Weather Update) अंदाज आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असून, सातारा जिल्ह्यातील शिरगाव येथे सर्वाधिक ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे २३० मिलिमीटर पाऊस झाला. दावडी येथे ३०० मिलिमीटर पाऊस झाला. लोणावळा येथेही २०० मिलिमीटर पाऊस पडला.