Weather Update: आज कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; उर्वरित भागात उघडिपीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली असली तरी मध्य महाराष्ट्रात मात्र अद्यापही परतीचा पाऊस सुरूच आहे. नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गुरूवारी (ता. २०) विजा, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. नगर, पुणे, नाशिकला पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकेडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान स्थिती ?

अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून (Weather Update) तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला यलो अलर्ट दिला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

error: Content is protected !!