Weather Update: राज्यात गारठा वाढू लागला; किमान तापमानाचा पारा 12.2 अंशांवर

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू (Weather Update) लागला आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली आला आहे. दरम्यान रविवारी नोंदवलेल्या तापमानानुसार निफाड येथे राज्यातील नीचांकी १२. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने (Weather Update) रविवारी (ता. ३०) दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सर्वदूर पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे.

निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन दुपारी (Weather Update) उन्हाची ताप वाढली आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे.

पुणे ३०.३ (१२.६), जळगाव ३३.८(१४.०), कोल्हापूर २९.७ (१७.७), महाबळेश्वर २५.७(१३.८), नाशिक २९.० (१३.३), निफाड ३०.२ (१२.२), सांगली ३१.६(१७.२), सातारा ३०.०(१४.३), सोलापूर ३२.८ (१६.१), सांताक्रूझ ३४.४(२०.५), डहाणू ३४.७ (२०.३), रत्नागिरी ३४.५ (२२.२), औरंगाबाद ३०.२ (१३.०), नांदेड ३१.८ (१६.४), उस्मानाबाद – (१५.२), परभणी ३०.९ (१५.४), अकोला ३३.७ (१७.८), अमरावती ३३.६ (१५.५), ब्रह्मपूरी ३३.२ (१७.१), बुलढाणा ३०.७ (१६.६), चंद्रपूर ३१.२ (१७.४), गडचिरोली ३१.६(१६.२), गोंदिया ३०.८(१७.०), नागपूर ३२.२ (१६.८), वर्धा ३२.२(१६.६), यवतमाळ ३२.५ (१५.०).