हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात थंडीची चाहूल लागली असून दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात सतत चढ-उतार (Weather Update) चालू आहे. दरम्यान राज्यात मागच्या २४ तासात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.
हवामान स्थिती
दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती कायम आहे. या प्रणालीपासून केरळ, लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैॡत्य बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवू लागला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. पहाटे गारठ्याबरोबरच काही प्रमाणात धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कुठे कसे तापमान ?
गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी (Weather Update) नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.८ (१३.१)
जळगाव ३३.३ (१३.७)
धुळे ३२ (११.८)
कोल्हापूर ३१.१ (२१)
महाबळेश्वर २६.१(१४.१)
नाशिक ३०.१ (१३.२)
निफाड ३०.२ (१०.५)
सांगली ३१.६ (२०.१)
सातारा २९.७ (१७.६)
सोलापूर ३३.५ (१८.१)
सांताक्रूझ ३४.६ (२०.२)
डहाणू ३४.८ (२०.२)
रत्नागिरी ३५ (२२)
औरंगाबाद ३०.६ (१४)
नांदेड ३१ (१७.२)
उस्मानाबाद ३०.७ (१६)
परभणी ३१ (१५)
अकोला ३३.१ (१६.९)
अमरावती ३२.४ (१५.१)
बुलडाणा २९.७ (१७)
ब्रह्मपुरी ३३.२ (१७.४)
चंद्रपूर – (१६.६)
गडचिरोली ३१.८(१५.८)
गोंदिया ३०.४ (१५.८)
नागपूर ३१.२ (१६.३)
वर्धा ३१(१६.६)
वाशीम ३१.२ (-)
यवतमाळ ३१.२ (१३.५).