हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात गारठा (Weather Update) कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या सर्वच भागांत पारा १८ अंशांच्या खाली आहे. मागच्या २४ तासात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. दरम्यान आज राज्यात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
हवामान अंदाज
केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार (Weather Update) वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून तमिळनाडू, दक्षिण अंदमान समुद्रापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच दक्षिण अंदमान समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढलेला गारठा कायम असून, पहाटे दव पडत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान दिसून आले असून, कोकणासह कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या वर आहे. उर्वरित राज्यात निरभ्र आकाशासह जोरदार वारे वाहत आहेत. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.७ (१३)
जळगाव ३४.५ (१५)
धुळे ३३ (११)
कोल्हापूर ३१.६ (१८.७)
महाबळेश्वर २५.२(१५.३)
नाशिक ३१ (१२.९)
निफाड ३१.२ (११.६)
सांगली ३२.२ (१७.७)
सातारा ३०.३ (१७.९)
सोलापूर ३३ (१९.९)
सांताक्रूझ ३४.९ (२०.६)
डहाणू ३४ (१९.६)
रत्नागिरी ३५.५ (२०.५)
औरंगाबाद ३१.८ (१३.१)
नांदेड ३२.२ (१६)
उस्मानाबाद ३१.३ (१७.४)
परभणी ३१.६ (१५)
अकोला ३४.२ (१७)
अमरावती ३३.४ (१५.५)
बुलडाणा ३१ (१६.४)
ब्रह्मपुरी ३३.८ (१७.३)
चंद्रपूर ३२ (१६.२)
गडचिरोली ३२ १६.२)
गोंदिया ३२ (१६.२)
नागपूर ३२.४ (१५.८)
वर्धा ३२.५(१६.६)
वाशीम ३२.४ (१६)
यवतमाळ ३१.५ (१५).