Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News)

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
सोन्याची किंमत असलेले टोमॅटो चोरी गेल्याची घटना पुण्यातून समोर आल्याची धकाकदायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे 20 कॅरेट चोरटयांनी चोरून नेले आहेत. यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अरुण बाळू ढोमे असं टोमटो चोरी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यामुळे शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. मात्र शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर टोमॅटो चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागत आहे.