Tomato Price : अर्रर्र… टोमॅटोच्या किमती होणार कमी, अभ्यासकांनी केला दावा

Tomato
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Price : राज्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक वर्षी टोमॅटोला पाहिजे तसे भाव मिळतच नाहीत. त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागतो. परंतु मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहे. एक किलो टोमॅटोची किंमत 150 रुपयांच्या वर गेली आहे. किंमत वाढल्याने अनेकांच्या ताटातून आता टोमॅटो गायब झाला आहे.

यावर्षी टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकरी टोमॅटो विकून लखपती झाला आहे. आणखी काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. याचा फायदा जरी शेतकऱ्यांना होत असला तरी ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे.

आता याच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे. कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किमतीमुळे केंद्राने टोमॅटो बाजारात हस्तक्षेप केली आहे. याचा परिणाम झाला टोमॅटोच्या किमतीवर झाला असून किमतीत नरमाई पाहायला मिळत आहे. दरम्यान, टोमॅटो किमतीमधील ही नरमाई पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता काही अभ्यासकांनी वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत टोमॅटोच्या किमती ३० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहतील, असा विश्वास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याचा परिणाम टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ शकतो.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दररोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव तर पाहायलाच मिळेल त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल ती ही अगदी मोफत. त्यामुळे आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello krushi हे ॲप इंस्टॉल करा.

शेतमाल : टोमॅटो (Tomato Price)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2023
कोल्हापूरक्विंटल96200080004300
अहमदनगरक्विंटल210400085006250
औरंगाबादक्विंटल5170001300010000
श्रीरामपूरक्विंटल1460001700012000
नवापूरक्विंटल74400080006703
विटाक्विंटल30500060005500
राहताक्विंटल14250060004200
पंढरपूरहायब्रीडक्विंटल5250097005000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2600070006500
पुणे-मोशीलोकलक्विंटल1408000100009000
नागपूरलोकलक्विंटल500500090008000
मंगळवेढालोकलक्विंटल15300094007200
जळगाववैशालीक्विंटल32200050003500
नागपूरवैशालीक्विंटल400500090008000
कराडवैशालीक्विंटल9700080008000