हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवण्याबाबत केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी (ता.18) केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, दोन दिवस उलटूनही त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली नाही. अखेर माध्यमांमधून अधिसूचना काढण्याबाबत ओरड झाली. त्यानंतर आज केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी माध्यमांसमोर येत कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवली नसल्याचे म्हटले आहे.
ग्राहक हितास सर्वोच्च प्राधान्य (Onion Export Ban Continue Till 31 March)
रोहित कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेली कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) ही 31 मार्चपर्यंत कायम असणार आहे. आज केंद्र सरकारकडून नव्याने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य हे देशातील सर्वसामान्य ग्राहकांना योग्य दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठीच असणार असल्याचेही या अधिकऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे आता गेल्या दोन दिवसांपासून कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाबाबतचा अधिसूचना नसल्याने असलेला संभ्रम दूर झाला आहे.
महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर २५ ते ३० लाख टन कांदा कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण १३ लाख टन कांदा देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या १२ ते १७ लाख टन कांद्यापैकी फक्त ३ लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा…
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 19, 2024
केंद्र सरकारवर टीकेचे झोड
दरम्यान, केंद्र सरकारच्या दुतोंड्या निर्णयामुळे आता सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेचे झोड उठत आहे. महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांदा कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण 13 लाख टन कांदा देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या 12 ते 17 लाख टन कांद्यापैकी फक्त 3 लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या घरी पाठवायचा का? शेतकऱ्यांची कांदा विक्री आटोपत आलेली आहे. असे असताना निर्यातीचा निर्णय निव्वळ व्यापाऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही. बंदी सरसकटच उठवायला हवी. अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ट्विट करत केली आहे.