अक्षय तृतीया निमित्त मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! KCC नवीनीकरण आणि देय मुदत 30 जून पर्यंत वाढवली

pm modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर एक लघुफीत दाखवण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड KCC या योजने अंतर्गत देशातील अप्लभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. देशातील दोन करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांना क्रिसन क्रेडिट कार्ड वाटण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलताना एक महत्त्वाची घोषणा केली. कोरोना काळ पाहता किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे नवीनीकरण आणि देय याची मर्यादा 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज घेतले आहे. ज्यांचे कर्ज थकीत आहे. तसेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्जाचे नूतनीकरणाची मुदत देखील 30 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच या याकाळात किसान क्रेडिट कार्ड व्याजदर चार टक्के आहे ते देखील चालू राहील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना दिली

https://www.facebook.com/hellokrushi/videos/249782726888531/

पी एम किसान ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.
2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.
3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.
6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण या क्रमांकावर कॉल देखील करू शकता

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109