Agriculture Business : जालन्याच्या शेतकऱ्याने बनवलीये पिठाची सायकल गिरणी; आता लाईटचे नो झंझट!

Agriculture Business Bicycle Flour Mill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील नागरिकांमध्ये टॅलेंटची (Agriculture Business) कमतरता नाहीये. मात्र, ते बाहेर येण्यासाठी काही प्रयत्न महत्वाचे असतात. आता अशाच प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सायकलच्या पायडलने चालणारी पिठाची सायकल गिरणी बनवली आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडून अनेक व्यवसाय केले जाऊ शकतात. त्यापैकीच एक म्हणजे गावात पिठाची गिरणी सुरु करणे. आता तुम्ही म्हणाल गावामध्ये 24 तास लाईट नसते. मग व्यवसाय (Agriculture Business) करायचा कसा? मात्र, जालना जिल्ह्यातील सुनील शिंदे या आठवी पास शेतकऱ्याने पायाने चालणारी पिठाची सायकल गिरणी शोधून काढली आहे. जिची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा होत आहे.

कशी सुचली कल्पना? (Agriculture Business Bicycle Flour Mill)

शेतकरी सुनील शिंदे हे जालना जिल्ह्यातील श्रीपत धामनगावचे (Agriculture Business) रहिवासी आहेत. त्यांनी 4 वर्षांच्या अथक परिश्रमातून बदल करत-करत, ही पायडलने चालणारी पिठाची सायकल गिरणी बनवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या पिठाच्या गिरणीची ग्रामीण भागातच नव्हे तर देश-विदेशात चर्चा आहे. शेतकरी सुनील शिंदे सांगतात, आपण पिठाची गिरणी बनवली त्यामागे शहरी लोक सकाळी उठून चालायला जातात, जीमला जातात. हा मुद्दा ठेवून ही गिरणी बनवली आहे. कारण या गिरणीमुळे लाईटचा प्रॉब्लेम असणाऱ्या ग्रामीण भागातच नव्हे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.

सर्वांना विक्रीसाठी खुली

शेतकरी सुनील शिंदे सांगतात, आपण आतापर्यंत विविध कृषी अवजारे बनवत होतो. मात्र, ग्रामीण भागातच नाही तर घराघरात वापर होईल अशी काहीतरी वस्तू बनवावी. या हेतूने आपण या गिरणीची निर्मिती केली असून, ती सध्या आपण सर्वांना विक्रीसाठी खुली करून दिली आहे. अर्थात ज्यांना आवश्यकता असते. अशा लोकांना ऑर्डर दिल्यानंतर तात्काळ काही दिवसात बनवून दिली जाते. कोणतीही लाईट नसताना पूर्वीच्या काळी जसे मानवी मेहनतीद्वारे जुन्या पद्धतीचे घरच्या जात्यावरचे दळण दळले जायचे. त्याच पद्धतीने अगदी कमी मेहनतीमध्ये या यंत्राच्या मदतीने दळण दळणे शक्य होते. असे ते सांगतात.

नागरिकांकडून मोठी मागणी

शेतकरी सुनील शिंदे सांगतात, गेल्या काही काळात आपण जवळपास 4 वर्ष या सायकल पिठाच्या गिरणीवर (Agriculture Business) काम केले. आता तिला एकदम अत्याधुनिक रूपात बनवण्यात आले असून, विदेशातून नागरिक देखील आपल्याकडे सोशल माध्यमांद्वारे या पिठाच्या गिरणीची चौकशी करत आहेत. सध्या नागरिकांची आपल्याकडे मोठी मागणी असून, आपण ग्राहकांना महिनाभरात ही सायकल गिरणी बनवून पाठवतो. विशेष म्हणजे एकदा खरेदी केल्यांनतर तिला कोणताही मेन्टनन्सचा खर्च नाही. किंवा वापरायला देखील कोणतेही बिल येत नाही. असेही ते सांगतात.