हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नागरिकांची खानपान संस्कृती आणि शहरी लोकसंख्या वाढल्याने, पोल्ट्री मांसाच्या (Poultry Farming) मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. 2001 ते 02 मध्ये देशातील मांसाचे उत्पादन 10 लाख टन इतके होते. जे सध्या 50 लाख टनांहून अधिक आहे. जागतिक पातळीवर भारत अंडी उत्पादनात दुसरा तर मांस उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. देशातील एकूण मांस उत्पादनात चिकनचा हिस्सा 52 टक्के इतका आहे. याच वेगाने देशातील चिकन उत्पादन वाढत राहिल्यास पुढील सहा वर्षात अर्थात 2030 पर्यंत देशातील चिकन उद्योग सध्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढेल, असे पोल्ट्री (Poultry Farming) फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
1300 कोटींहून अधिक अंडी उत्पादन (Poultry Farming Chicken Industry)
देशातील अन्य क्षेत्रापेक्षा पोल्ट्री क्षेत्र हे वेगाने विकसित होत असून, देशातील अंडी आणि चिकन या दोन्हीचेही उत्पादन वाढत आहे. पोल्ट्री उद्योगाने (Poultry Farming) मागील 20 ते 25 वर्षांमध्ये पोल्ट्री उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. सध्या देशातील पोल्ट्री उद्योगातील पक्षांची संख्या 85 कोटी इतकी आहे. मागील पाच वर्षांमध्ये पोल्ट्री उद्योगातील वृद्धी दर वार्षिक सात ते आठ टक्क्याने वाढत आहे. मागील वर्षी देशभरात एकूण 1300 कोटींहून अधिक अंडी उत्पादन झाल्याचे पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
चिकन उद्योग सध्या 6 टक्क्यांवर
सध्याच्या घडीला देशभरात फास्ट फूडमध्ये चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय फ्रोजन आणि पैक्ड चिकनची देखील मागणी वाढली आहे. मात्र, मागणीमध्ये पाहिजे तितका वेग नाही. यामागे शीतगृहांची साखळी कारणीभूत ठरत आहे. देशात सध्या प्रक्रियाकृत चिकनची मागणी एकूण मांस उत्पादनाच्या 6 टक्के इतकी आहे. मात्र, आगामी काळात देशातील चिकन उद्योग सहा वर्षात 20 ते 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. असेही पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
सध्याच्या घडीला देशभरातील अनेक भागांमध्ये दुकानांमध्ये चिकन विक्री होते. मात्र सध्या नागरिकांमध्ये प्रक्रियाकृत चिकन मागणी वाढली आहे. त्यामुळे शीतगृहांची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या केएफसी हा चिकन ब्रँड सध्या आपला व्यवसाय वेगाने वाढवत आहे. याशिवाय मॅक्डोनाल्डच्या माध्यमातून देखील चिकन मागणी वाढ नोंदवली गेली आहे. असेही पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.