Success Story : विदेशी केळी वाणाची सोलापुरात यशस्वी लागवड; 2 एकरात 30 लाखांची कमाई!

Success Story Of Blue Java Banana Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या दशभरापासून अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) आपले नशीब आजमावताना दिसत आहे. अशातच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतीमधील मानवी कष्ट देखील कमी झाले आहे. याशिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना विदेशी जातींच्या पिकांची लागवड करणे देखील शक्य होत आहे. आज आपण अशाच एका सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी ‘ब्लू जावा’ या विदेशी वाणाच्या मदतीने केळीची लागवड केली असून, त्यातून त्यांना 2 एकरात 30 ते 35 लाखांचे उत्पन्न (Success Story) मिळण्याची अपेक्षा आहे.

नर्सरीच्या माध्यमातून मागवली रोपे (Success Story Of Blue Java Banana Farming)

अभिजीत पाटील असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या (Success Story) वाशिंबे गावचे रहिवासी आहे. विशेष म्हणजे अभिजित यांनी इंजिनियरिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, आपल्या अमेरिकेतील एका मित्राच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांना केळीची शेती करण्याचा विचार डोक्यात आला. यासाठी त्यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ‘ब्लू जावा’ या वाणाची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एका नामांकित खासगी नर्सरीच्या माध्यमातून अमेरिकेतून ‘ब्लू जावा’ वाणाची केळीची रोपे मागवली.

किती मिळणार उत्पादन?

अभिजीत पाटील यांनी रोपे उपलब्ध झाल्यानंतर ती आपल्या दोन एकर शेतीमध्ये लावली. विशेष म्हणजे त्यांच्या केळीची बाग सध्या काढणीला आली (Success Story) असून, पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये संपूर्ण केळीची तोडणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याची शेतातील केळी घडांची संख्या पाहता, आपल्याला दोन एकर रानात 35 ते 40 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

किती आला उत्पादन खर्च?

आपण नुकतीच काही केळी पुणे येथील बाजार समितीत पाठवली असता, आपल्याला ‘ब्लू जावा’ केळीला प्रति किलोसाठी 90 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. ज्यातून आपल्याला 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी अभिजित पाटील सांगतात. या केळीच्या लागवडीसाठी आपल्याला एकूण अडीच लाख रुपयांचा खर्च आला आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.

‘ब्लू जावा’ वाणाची वैशिष्ट्ये?

‘ब्लू जावा’ या अमेरिकी केळी वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे फळ हे मध्यम आकाराचे असून, एका घडात 10 ते 12 फण्या आहेत. हे विदेशी वाण इतर स्थानिक वाणाप्रमाणेच दहा महिने कालावधीत काढणीला आले आहे. ब्लू जावा केळीचा गर मलईसारखा असून, त्याची चव आईस्क्रीमसारखी असते. त्यामुळे या वाणाला ‘आईस्क्रीम केळी’ असे देखील म्हटले जाते. या वाणाच्या मदतीने अमेरिका, व्हिएतनाम, फिलीपाइन्स या देशात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.