Pashu Kisan Credit Card: पशुपालक क्रेडिट कार्ड योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालक क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) योजनेंतर्गत शेतकऱ्यांची (Farmers) किंवा पशुपालकांची (Cattle Breeders) जनावरे आजारी पडल्यास, गरीब पशुपालकांना पैशाच्या अभावामुळे त्यांच्यावर उपचार करता येत नाही. अशा परिस्थितीत पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत केली जाते. शेतकर्‍यांना पशुपालनास (Animal Husbandry) प्रोत्साहन मिळावे. यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना (Pashu Kisan Credit Card) सुरू करण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट्य असणार आहे.

पशुपालक किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता (Pashu Kisan Credit Card)

  • या योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन (Agriculture Land) कमी आहे, ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पशुपालक क्रेडिट कार्डचे फायदे

  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, कोणत्याही शेतकऱ्याला प्रति गाय (Cow) रु. 40,000 देण्यात येईल.
  • तसेच म्हशीचे (Buffalo) पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी रु. 60,000 देण्यात येईल.
  • जर पशुपालक शेतकऱ्याने शेळीचे पालन (Goat Farming) करत असेल, तर त्याला प्रति शेळी रु. 4000 देण्यात येतील.
  • किसान पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यास केंद्र शासनाकडून रु. 1,60,000 पर्यंतचा निधी मिळवू शकतात.

पशु शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत किती कर्ज मिळेल

  • जर पशुधन मालकाकडे गायी असतील, तर तो प्रत्येक गायीसाठी रु. 40,783 पर्यंत प्रति गाय कर्ज घेऊ शकतो.
  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत हे कर्ज बँकेच्या आर्थिक मापदंडानुसार शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये दिले जाते. हे कर्ज 6 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजेच रु. 6,797 दरमहा बँकेकडून दिले जाते.
  • जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या महिन्याचा हप्ता पशुपालक शेतकऱ्याला मिळू शकला नाही तर, त्याला पुढच्या महिन्यात पशु शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत हप्ता मिळेल.
  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी काही लोन रक्कम मिळते, ती पशुपालक शेतकऱ्याला त्याच्या पुढील वर्षी 4% व्याजदरासह परत करावी लागेल.
  • शेतकऱ्याला पहिल्या हप्त्याची रक्कम मिळते, तेव्हापासूनच कर्ज परतफेड कालावधी 1 वर्षाचा सुरु होतो.  

पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • शेतकरी नोंदणीची प्रत
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र

अर्ज कसा व कुठे करायचा?

पशू शेतकरी क्रेडिट कार्ड साठी ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना बँकेत जाऊन पशु किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागेल. केवायसीची कागदपत्रे फॉर्ममध्ये भरावी लागतील. केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे. मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखी कागदपत्रे ही जाताना सोबत ठेवावीत.