Mini Tractor : ट्रॅक्टर घ्यायचा विचार करताय; ‘हे’ आहेत दोन सर्वोत्तम मिनी ट्रॅक्टर!

Mini Tractor For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये आता यांत्रिकीकरण (Mini Tractor) खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. शेतीची बरीच कामे आता यंत्रांच्या साहाय्याने केली जातात. शेती क्षेत्रामधील यंत्रांचा वापरामुळे शेतीची मशागत ते पीक लागवड आणि पिकांचे काढणीपर्यंतची कामे ही यंत्रांच्या साहाय्याने करता येणे शक्य आहे. परंतु या सर्वच यंत्रांमध्ये शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणात होतो. अगदी लागवडीसाठी जमीन तयार करणे असो की शेतीमधील मालाची ने-आण इत्यादी कामांसाठी ट्रॅक्‍टरचा (Mini Tractor) वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

अक्षय तृतीयेचा मुहूर्त (Mini Tractor For Farmers)

याशिवाय फळबागांमध्ये बागेतील आंतरमशागतीसाठी ट्रॅक्‍टरचा (Mini Tractor) वापर केला जातो. परंतु खास करून यासाठी छोट्या ट्रॅक्टर अर्थात मिनी ट्रॅक्टरचा वापर फायद्याचा ठरतो. त्यामुळे आज आपण शेतीच्या कामासाठी फायद्याचे ठरतील अशा दोन ट्रॅक्टरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही देखील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर फार्मट्रेक ऍटम 26 किंवा सोनालीका जीटी 20 आरक्स हे दोन ट्रॅक्टर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

हे’ आहेत दोन मिनी ट्रॅक्टर

फार्मट्रेक ऍटम 26 : फार्मट्रेक ऍटम 26 हा ट्रॅक्टर शेती आणि फळ बागातील कामांसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे ट्रॅक्टर तीन सिलेंडर आणि 26 हॉर्स पावर इंजिनने समर्थित आहे. तसेच यामध्ये कॉन्स्टंट मॅक्स गिअर बॉक्स आहे. यामध्ये पुढील बाजूस नऊ गिअर्स आणि रिव्हर्स तीन गिअर्स देण्यात आलेले आहेत. तसेच या ट्रॅक्टरला ऑइल इमरस्ड डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहे. तसेच या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही 750 किलोपर्यंत आहे. ट्रॅक्टरची किंमत चार लाख ऐंशी हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे.

सोनालीका जीटी 20 आरक्स : सोनालीका जीटी 20 आरक्स या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर आणि 20 हॉर्सपॉवर क्षमतेची इंजन आहे. या ट्रॅक्टरमध्ये यांत्रिक स्लाइडिंग मॅश गिअर बॉक्स देण्यात आला असून, या ट्रॅक्टरला पुढील बाजूस सहा गिअर्स आणि मागील बाजूस दोन गिअर्स दिले आहेत. या ट्रॅक्टरची डिझेल टाकी 32 लिटरची असून, त्याची वजन उचलण्याची क्षमता 650 किलोपर्यंत आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत तीन लाख 30 हजार रुपये तीन लाख 60 हजार रुपयांपर्यंत आहे.