हॅलो कृषी ऑनलाईन: फ्लॉवर पिकांमध्ये अनेक रोगांचा (Black Rot Disease in Cauliflower) प्रादुर्भाव होतो, त्यापैकी गड्डा सड हा एक प्रमुख रोग आहे. हा रोग पानांवर आणि गड्ड्यांवर दिसून येतो आणि त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. फुलकोबी व्यतिरिक्त गड्डा सड रोग (Black Rot in Cauliflower) कोबी, चायना कोबी, ब्रोकोली, बृशेल, मोहरी या पिकांवर सुद्धा आढळतो. जाणून घेऊ या रोगाची लक्षणे आणि नियंत्रण उपाय.
रोगाची कारणे (Black Rot Disease in Cauliflower)
- हा रोग अल्टरनेरिया ब्रासिसिकोला (Alternaria brassicicola) नावाच्या बुरशीमुळे (Fungal Diseases) होतो.
- हा रोग बीजाणूंद्वारे बियाणे, जमीन आणि पिकांच्या अवशेषांमधून पसरतो.
- 85 ते 90 टक्के आर्द्रता आणि 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान या रोगासाठी अनुकूल आहे.
- पाण्याचा ताण, अन्नद्रव्यांची कमतरता, किडींचा प्रादुर्भाव यामुळेही गड्डा सड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
लक्षणे
रोगाच्या सुरुवातीला जुन्या पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. हळूहळू हे ठिपके अर्धा इंचापर्यंत वाढू शकतात आणि एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे दिसतात. कालांतराने नवीन पानांवरही हे ठिपके दिसून येतात आणि पाने वाळून गळून पडतात. फुलकोबीच्या गड्ड्यांवर काळसर रंगाचे ठिपके दिसू लागतात आणि हळूहळू संपूर्ण गड्डा काळसर होतो.
नुकसान
या रोगामुळे (Black Rot Disease in Cauliflower) पिकाचे साधारणतः 10 ते 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
एकात्मिक नियंत्रण उपाय
प्रतिबंधात्मक उपाय
- लागवडीसाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा.
- बियाण्यांना बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया (Seed Treatment With Fungicides) करावी.
- पिकांची फेरपालट (Crop Rotation) करावी.
- पिकाला योग्य प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे.
- पिकांवर येणार्या किडींचे वेळीच नियंत्रण करावे (Pest Management).
नियंत्रण उपाय
जमिनीवर व झाडावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
खालील शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी
क्लोरोथॅलोनील (75 टक्के डब्ल्यूपी) किंवा मॅन्कोझेब (75 टक्के डब्ल्यूजी) किंवा ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (4.8 टक्के डब्ल्यू/डब्ल्यू) अधिक क्लोरोथॅलोनील (40 टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी) (संयुक्त बुरशीनाशक)