हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या हवामान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, (Market Rate Today) निर्यात व निर्यातशुल्क या व इतर बाबींचा वेगवेगळ्या पिकांच्या बाजारभावावर परिणाम होतांना दिसत आहे. जाणून घेऊ या तूर, सोयाबीन, कांदा, कापूस या महत्त्वाच्या पिकांचे आजचे बाजारभाव (Market Rate Today).
सोयाबीन: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात (Agricultural Products) घसरण झालेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव (Soybean Bhav) 12.12 डॉलर प्रति बुशेल एवढे आहे. तर सोयापेंडचा भाव 374 डॉलर प्रति टन एवढे आहे (Market Rate Today.
देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास सोयाबीनचे सरासरी भाव 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपये प्रति बुशेल एवढे आहे (Market Rate Today.
कापूस: आंतरराष्ट्रीय आणि देशांत कापसाच्या वायदे बाजारात चढ उतार दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 78.35 सेंट प्रति पाऊंड एवढे आहे. तर देशातील वायदे 57 हजार 300 रुपये प्रति खंडी एवढे आहे.
कापसाचे बाजार (Market Rate Today समित्यांमधील दर (Cotton Rate) प्रति क्विंटलला 7100 ते 7500 रुपये एवढे आहे.
कांदा: केंद्र सरकारने कांदानिर्यातबंदी उठवून सुद्धा कांद्याचे भाव (Onion Market Rate) घसरले आहेत. सध्या कांद्यालासरासरी भाव 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल एवढे आहे.सरकारने निर्यात शुल्क (Onion Export Charges) काढल्यास भाव सुधारण्याची शक्यता आहे.
तूर: वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळे तुरीला अच्छे दिन आहेत. देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीला सरासरी भाव (Tur Market Rate) 11 हजार रुपये प्रति क्विंटल एवढे आहे.देशभरातील बाजारातील सरासरी भाव 10 हजार ते 10 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल एवढे आहे.
मका: देशात मक्याचे भाव (Maize Market Rate) टिकून आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात घट झालेली आहे.
मक्याला सध्या सरासरी भाव 2 हजार ते 2 हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढे आहे.