हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे शेतीसाठी नवनवीन आधुनिक उपकरणे (Mini Tractors) बाजारात उपलब्ध आहेत. या आधुनिक व दर्जेदार उपकरणांमुळे शेती करणे अधिक सुलभ झाले आहे. या उपकरणांमध्ये सर्वात जास्त मागणी ट्रॅक्टरची असते .तसेच फळबाग, फळभाज्यांच्या लागवडीसाठी, औषध फवारणीसह आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) अधिक उपयुक्त ठरत असतात. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.
मॅसी फर्ग्युसन 30 डीआय ऑर्चर्ड प्लस (Mini Tractors For Farmers)
परिणामी, आता तुम्हीही एखादा छोटा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल, तर बाजारात अनेक मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) उपलब्ध आहेत. मिनी ट्रॅक्टरमध्ये 20 ते 30 एचपी क्षमतेपर्यंत अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मिनी ट्रॅक्टर आकाराने छोटे असले तरी मजबूत इंजिन आणि उत्कृष्ट आरएमपीमुळे ते शेतीची सर्व कामे करू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण मॅसी फर्ग्युसन 30 डीआय ऑर्चर्ड प्लस या मिनी ट्रॅक्टरबद्दल जाणून घेणार आहोत.
काय आहेत वैशिष्ट्ये?
मॅसी फर्ग्युसन 30 डीआय ऑर्चर्ड प्लस या ट्रॅक्टरमध्ये 30 एचपी क्षमतेचे इंजिन आहे. या ट्रॅक्टरला 2 सिलेंडरसह 1670 सीसी इंजिन आहे. जे 1000 आरपीएम आणि 1500 ईआरपीएम जनरेट करते. यात सिंगल क्लच सिस्टीम आहे. यासोबतच या ट्रॅक्टरला मॅन्युअल स्टीयरिंग, एक्सपांडेबल मेकॅनिकल ब्रेक आहे. या ट्रॅक्टरची हायड्रॉलिक क्षमता 1100 किलो आहे. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर आणि प्लँटर आणि इतर उपकरणे सहज करता येतात.
किती आहे किंमत?
मॅसी फर्ग्युसन 30 डीआय ऑर्चर्ड प्लस या ट्रॅक्टर मदतीने फळबाग शेतीशिवाय गहू, भात आणि ऊस लागवडीसाठीही मदत होते. या छोट्या ट्रॅक्टरमध्ये टूल्स, हुक, टॉप लिंक, कॅनोपी, ड्रॉवर हिच आणि बंपर यांसारखे अटॅचमेंट देखील उपलब्ध असतील. मॅसी फर्ग्युसन कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 5.40 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. अर्थात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्यामुळे या ट्रॅक्टरची किंमत विविध राज्यांमध्ये वेगवेगळी पाहायला मिळू शकते.