हॅलो कृषी ऑनलाईन : काहीतरी वेगळे करण्यात शेतकऱ्यांचा हात (Viral Video) कोणीच धरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी कर्नाटाकातील एका शेतकऱ्याला खिशात 10 रुपये आहेत का? असे विचारत कार खरेदी दरम्यान अपमानित करण्यात आले होते. मात्र, त्या शेतकऱ्याने अवघ्या 30 मिनिटात तब्बल 10 लाख रुपये जमवून ती कार खरेदी केली होती. याबाबत आपण ऐकलेच आहे. मात्र, आता एका तरुण शेतकऱ्याचा महिंद्राच्या 7 सीटर कारने शेती नांगरली असल्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर सर्वदूर चर्चा (Viral Video Mahindra Car Plowed Farm)
शेती म्हटले की, नांगरणी आलीच. कुणी बैलजोडीने जमीन नांगरतोय; तर कुणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करत असतो. पण, एका तरुणाने तर चक्क नांगराला कारच जुंपली आहे. आणि या गाडीच्या माध्यमातून तो शेतकरी जमीन नांगरतो आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. प्रामुख्याने शेती नांगरणीची ही पद्धत पाहून सर्वच आश्चर्यचकित होत आहे.
प्रतिक्रिया देत युजरकडून कौतुक
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) धुळीने माखलेल्या शेतात महिंद्रा कार हे चारचाकी वाहन चालताना दिसत आहे. या व्यक्तीने कारच्या पाठीमागे नांगर बांधला आहे आणि नंतर त्याद्वारे संथ गतीने नांगरणी केली जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याच्या या अनोख्या नांगरणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ज्यात ते या शेतकऱ्याचे कौतुक करताना आढळून येत आहे.
काय आहे शेतकऱ्याचे नाव?
आता तुम्ही म्हणाल की, कारने नांगरणी कशी बरे करता येईल. तर @TorqueIndia नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर)वर शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कारमध्ये चालक नाही आणि गाडी स्वतःहून पुढे जात आहे. सुरुवातीला कारमध्ये ड्रायव्हर होता; पण मधेच तो खाली उतरला आहे. उपलब्ध माहितीनुसार, rahul_raosaheb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ सर्वप्रथम आढळून आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता अलीकडेच ‘महिंद्राच्या कार म्हणजे कचरा’ अशी एका टिप्पणी एका युजरने केली होती. ज्याबाबत विशेष चर्चा झाली होती. त्यामुळे आता हा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.