हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांपैकी सर्वात जास्त ट्रॅक्टर (Mini Tractor) या यंत्राचा वापर होतो. शेतीसाठी ट्रॅक्टर हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. शेतीमधील अनेक छोटी-मोठी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहजतेने करता येतात. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेत देखील अनेक कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या मॉडेलचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. परंतु, तुमच्याकडे शेतीचे कमी क्षेत्र असेल म्हणजे शेती कमी असेल. मात्र, तुम्हाला एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ‘फोर्स ऑर्चर्ड 30’ हा छोटा ट्रॅक्टर (Mini Tractor) उत्तम पर्याय ठरणार आहे. याचा पार्श्वभूमीवर आज आपण या ट्रॅक्टरबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
फोर्स ऑर्चर्ड 30 ट्रॅक्टरबद्दल (Mini Tractor For Farmers)
‘फोर्स ऑर्चर्ड 30’ या छोट्या ट्रॅक्टरमध्ये (Mini Tractor) तीन सिलेंडर चार स्ट्रोक, इनलाईन, डायरेक्ट इंजेक्शन, वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हा छोटा ट्रॅक्टर प्रामुख्याने 30 एचपी पॉवर जनरेट करतो. तसेच कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला उत्तम दर्जाचे असे एअर फिल्टर दिले असून, जे इंजिनचे धुळीपासून संरक्षण करतात. या ट्रॅक्टरला कंपनीने 29 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते. ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता ही 1000 किलो ठेवण्यात आली असून, या ट्रॅक्टरचे वजन 1740 किलो इतके आहे. या मिनी ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 277 एमएम इतका ठेवण्यात आला आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
‘फोर्स ऑर्चर्ड 30’ या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला मेकॅनिकल/ पॉवर स्टीयरिंग पाहायला मिळते. जी शेतीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने ड्राइविंगसाठी फायद्याची आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. या छोट्या ट्रॅक्टरला कंपनीने ड्राय टाईप ड्युअल क्लच दिला आहे. जो कॉन्स्टंट मेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. कंपनीचा हा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर फुल्ली ऑइल इमर्स मल्टिप्लेक्स सीलबंद डिस्क ब्रेकसह येतो. तसेच कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 5.0-15 आकारात आणि मागील बाजूस 12.4-28 आकारात टायर दिलेले आहे.
किती आहे किंमत?
‘फोर्स ऑर्चर्ड 30’ मिनी ट्रॅक्टरची किंमत कंपनीने अगदी परवडण्याजोगी ठेवली असून, भारतात या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख ते पाच लाख वीस हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये जे काही रोड टॅक्स लागू आहेत. त्यामुळे बदलू शकते.