Success Story : उसाच्या पट्ट्यात सफरचंदाची यशस्वी शेती; अहमदनगरमधील शेतकऱ्याची किमया!

Success Story Of Apple Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रात थोडेसे पारंपरिक पद्धतीला फाटा देत काही नाविन्यपूर्ण बदल (Success Story) केले तर नक्कीच फायदा मिळते. शेतीमध्ये हेच नाविन्यपूर्ण बदल करून, अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने किमया करून दाखवली आहे. नेवासा तालुका हा तसा उसाचा पट्टा असणारे क्षेत्र आहे. परंतु, या तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात सफरचंदाची बाग फुलवली आहे. ज्यामुळे सध्या या शेतकऱ्याच्या यशस्वी सफरचंद शेतीची (Success Story) सर्वदूर चर्चा होत आहे.

उंचावतायेत अनेकांच्या भुवया (Success Story Of Apple Farming)

आदिनाथ मुंगसे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते नेवासा तालुक्यातील देडगाव येथील रहिवासी आहेत. तसे तर सफरचंद म्हटले की आपल्याला काश्मीर आठवतो. पण हेच सफरचंद पीक देडगाव येथील एका शेतकऱ्याने यशस्वी (Success Story) करून दाखवले आहे. ताजी गुलाबी सफरचंदे घेण्यासाठी पंचक्रोशीतून ग्राहक या सफरचंदाच्या बागेला भेट देत आहे. विशेष म्हणजे काश्मीरसारखे वातावरण नसतानाही आदिनाथ यांच्या बागेत चांगल्या प्रकारे सफरचंद लगडली असल्याने, अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

फुलवली यशस्वी सफरचंद बाग

सफरचंद हे कश्मीर हिमाचल या थंड प्रदेशातील फळ असून, या फळबागेचा आपल्या परिसरात लागवड करून त्याचे उत्पादन घेण्याचा विचारही आजवर कोणी केला नव्हता. मात्र, देडगावच्या या नवनवीन प्रयोग करणाऱ्या प्रगतिशील युवक शेतकऱ्याने कश्मीरमध्ये येणारे हे फळ आपल्याकडे येऊ शकते का? याचा विचार करून त्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले. आणि त्यांनी सफरचंद बाग यशस्वी देखील करून दाखवली आहे.

किती मिळतोय दर?

शेतकरी आदिनाथ मुंगसे सांगतात, मागील वर्षीच्या अतिवृष्टीने नुकसान झाले. यंदा मात्र प्रत्येक झाडाला साधारण दहा किलो फळे लागलेली आहेत. फळांचा रंग अतिशय चांगला आहे, चवही चांगली असल्याने आपल्याकडच्या या सफरचंदाच्या बागेचे कुतूहल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना वाटत असून, या दर्जेदार ताजे सफरचंद घेण्यासाठी सध्या पंचक्रोशीतून या सफरचंदाच्या बागेत ग्राहक येत आहे. जागेवरच व्यापारी शंभर रुपये किलोप्रमाणे ताजे सफरचंद खरेदी करत आहे. यंदाच्या पहिल्याच तोड्यात त्यांना अडीच लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

किती आला उत्पादन खर्च?

शेतकरी आदिनाथ मुंगसे यांना 250 रोपांच्या लागवडीसाठी 65 हजार रुपये खर्च आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना बागेला शेणखतासाठी 25 हजार रुपये, खुरपणी व गवत काढणीचा खर्च एक लाख रुपये आला आहे. त्यांनी 2021 मध्ये हिमाचल प्रदेशातून हार्मोन – 99 या जातीचे सफरचंदाचे 250 रोपे आणून त्याची 30 गुंठ्यांमध्ये लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता केवळ शेण खत वापरून चार वर्षांतच सफरचंदाची झाडे अतिशय चांगली आली असून, 2023 मध्ये तिसऱ्या वर्षीच या झाडांना फळे लागली होती.