Dairy Farming : शेतकऱ्यांनो… पावसाळा येतोय, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा संपूर्ण माहिती!

Dairy Farming In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पशुपालनात (Dairy Farming) साधारणपणे 60 ते 70 टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावर, तर उर्वरित 30 ते 35 टक्के खर्च आरोग्यावर होतो. यामुळे आरोग्याची काळजी घेतल्यास ते पैसे वाचतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः पावसाळ्यात जनावरांची (Dairy Farming) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर गरजेचा (Dairy Farming In Maharashtra)

दरम्यान, पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गोठा स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच खाद्यामध्ये बदल झाल्यामुळे पोटाचे आजार उद्‌भवतात. पावसाळ्यात जास्त आर्द्रता आणि कमी तापमान या बाबींमुळे गोठ्याचा पृष्ठभाग कायम ओलसर राहतो. यामुळे गोठ्यात विविध रोगजंतूंची वाढ होऊन जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते.

कसे असावे चारा व्यवस्थापन?

त्यासाठी पावसाळ्यात गोठा, खाद्य आरोग्यावर भर देऊन जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पोटफुगी टाळण्याकरिता पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुके खाद्य दोन ते तीन किलो या प्रमाणात द्यावे. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थितरीत्या कार्य करते. जनावरांना दिवसभर फक्त कोवळा हिरवा चारा खाऊ घालू नये.

प्रतिबंधात्मक लसीकरण महत्वाचे

जखम झालेली जागा पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या साह्याने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी. जनावरे जास्त चिखल असलेल्या ओबडधोबड ठिकाणी चरायला सोडू नयेत. गोठ्यातील खड्डे बुजवून घ्यावेत. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. पावसाळ्यापूर्वी घटसर्प, एकटांग्या या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.

गोठ्याचे योग्य व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी. पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा. गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल. तसेच गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील. गोठ्यातील दलदल कमी झाल्यास स्तनदाह आजार कमी होण्यास होतो.