Tur Bajar Bhav: बाजार समितीमध्ये तूर खातेय भाव; कमी आवक असल्याचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या तुरीची (Tur Bajar Bhav) आवक मंदावली असून बहुतांश बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) तुरीला क्विंटलमागे 10 ते 12 हजार रूपयांचा भाव मिळत आहे. इतर शेतमालाला मिळणाऱ्या भावापेक्षा तुरीला चांगला भाव (Tur Market Rate) मिळत असल्याचे पणन विभागाच्या (Marketing Department) माहितीवरून दिसून येत आहे. दरम्यान आज राज्यात 6777 क्विंटल तुरीची (Tur Bajar Bhav) आवक झाली.

आज लाल तुरीसह (Red Tur) पांढरी, गज्जर तूर बाजारपेठेत विक्रीकरता दाखल झाली होती. यावेळी क्विंटलमागे शेतकऱ्यांना 10,000 ते 12100 रूपयांचा भाव मिळत आहे. आज लातूर मध्ये तुरीला (Tur) सकाळच्या सत्रात 11950 रूपयांचा दर मिळाला. तर नागपूर, परभणी, धाराशिवमध्येही क्विंटलमागे मिळणारा दर (Tur Bajar Bhav) 11 हजारांहून अधिक होता.

राज्यात सर्वाधिक आवक नागपूर बाजार समितीत (Nagpur Bajar Samiti) झाली. 566 क्विंटलची आवक झाली असून क्विंटलमागे 11 हजार 850 रूपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. लाल तुरीला बहुतांश ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय? (Tur Bajar Bhav)

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
22/05/2024
बुलढाणालाल42968331160010717
छत्रपती संभाजीनगर—-6112211122111221
धाराशिवगज्जर241116001182211711
धुळेलाल10100001083510100
हिंगोलीलाल59106001180011200
जळगावलाल2088001100010251
जालनापांढरी380001035010000
लातूरलाल25110001200011500
लातूरपांढरी34118001210011950
नागपूरलाल566105001230011850
नांदेडलाल890001100010000
नाशिकलाल28700011120१०८२५
परभणीलाल38110001100011000
सोलापूरलाल371102751188311430
वर्धालाल30116250
येवतमाळलाल65112551230011750
राज्य एकूण आवक (Qtl.)1906
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.