Success Story : पारंपारिक पिकांना फाटा; खरबूज शेतीतून अल्पावधीत मिळवला 2 लाखांचा नफा!

Success Story Of Muskmelon Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग (Success Story) करताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. तसेच पारंपारिक पिकांना बगल देत नवीन पिकांची लागवड करत आहेत. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्याने खरबूज पिकाच्या लागवडीतून अवघ्या तीनच महिन्यात लाखो रुपयांचा नफा (Success Story) मिळवला आहे.

2 एकरात खरबूज लागवड (Success Story Of Muskmelon Farming)

मोहम्मद आदिल असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. बहुतेक शेतकरी उन्हाळी हंगामात देशी खरबूज पिकाची (Success Story) लागवड करतात. यामध्ये कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो. शेतकरी मोहम्मद आदिल यांनी देखील देशी खरबूजाची लागवड केली होती. ते दरवर्षी 2 एकर क्षेत्रावर खरबुजाची लागवड करतात. या माध्यमातून ते चांगला नफा कमावतात. सध्या बाजारात स्थानिक खरबुजाची मागणीही वाढत आहे.

किती मिळाले उत्पन्न?

मोहम्मद आदिल सांगतात, “खरबूज पिकाचे कीटक आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला. याशिवाय वेळोवेळी फवारण्यांचा वापर करत, खते आणि कीटकनाशके दिली. खरबुजाचे पीक (Success Story) साधारपणे 60 ते 70 दिवसांत तयार होते. बाजारात स्थानिक खरबुजाची मागणी खूप जास्त आहे. यावर्षी खरबूज शेतीतून त्यांना एका पिकासाठी सुमारे 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. 2 एकरासाठी त्यांना सुमारे 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे.”

मल्चिंग बेडवर लागवड

खरबुजाचे पीक तयार करण्यासाठी सर्व प्रथम शेतात व्यवस्थित नांगरणी केली जाते. त्यानंतर सेंद्रिय खत टाकून संपूर्ण शेतात मल्चिंग बेड तयार करून लागवड केली जाते. यावेळी बियाणे चांगले लागले. प्रत्येक रोपातून 4-5 किलोपेक्षा जास्त माल तयार झाला. मल्चिंग बेडद्वारे शेती केल्यास पिकाला कमी पाणी लागते. कारण यामुळे ओलावा जास्त काळ टिकतो. ज्यामुळे उत्पादन वाढते, असेही शेतकरी मोहम्मद यांनी शेवटी म्हटले आहे.

खरबूज खाण्याचे फायदे

खरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे खाल्ल्याने शरीर थंड राहते. पाण्याची कमतरता देखील दूर करते. तसेच खरबूजमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास सक्षम असतात. व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते.