हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेकांचा शेतीकडे ओढा (Success Story) वाढत चालला आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनीही बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर ती परवडते, हे विनायक केळकर यांनी सिद्ध करून (Success Story) दाखवले आहे.
आठ एकरात फुलवली फळबाग (Success Story Of Orchard Farming)
शेतकरी विनायक केळकर यांनी सोमेश्वर येथे आपल्या आठ एकर क्षेत्रात फळबाग फुलवली (Success Story) आहे. 150 आंबा, 400 काजू, 30 नारळ, 300 सुपारीची लागवड केली आहे. नारळी व सुपारीवर त्यांनी 200 काळीमिरीची कलमे लावली आहेत. खरीप हंगामात 25 गुंठे क्षेत्रावर भात लागवड करीत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन व्यवसाय देखील ते करत आहे. त्यांच्याकडे पाच म्हशी असून, दिवसाला २५ लिटर दुधाची विक्री करतात.
शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीवर भर
इतकेच नाही तर शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग देखील त्यांनी सुरू केला आहे. त्यामध्ये विविध प्रकारची लोणची, पिठे, सांडगी मिरची, आंबा, फणसपोळी, कोकम तयार करून विक्री करतात. विशेष म्हणजे उत्पादित प्रक्रियाकृत मालाची ते स्वतः विक्रेत्यांशी संपर्क साधून विक्री करत आहेत. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. घरगुती उत्पादनांचा दर्जा उत्तम असल्याने ग्राहकांकडन हातोहात खरेदी होत आहे. ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहे.
सेंद्रिय खतनिर्मिती
पेरणीसाठी बियाणे निवड, खत ते पाणी व्यवस्थापनावर विनायक स्वतः लक्ष केंद्रित करतात. ग्राहकांशी थेट संपर्क साधून दर ठरवितात. त्यामुळे शेतमाल उत्पादनाची विक्री सुलभ झाली आहे. शिवाय दूध विक्री चांगली होत असल्याचे ते सांगतात. फळबागेतील पालापाचोळा, म्हशीचे शेण एकत्रित करून कंपोस्ट खतनिर्मिती करत आहेत. बागायती व शेतीसाठी त्याचा वापर करत आहेत. सेंद्रिय शेतीवर विनायक यांचा भर आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा मर्यादित वापर करत असून, उत्पादनाचा दर्जा उत्तम राखण्यात यश आले असल्याचे विनायक यांनी सांगितले आहे.
ग्राहकांकडून सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत आहे. हाच दृष्टिकोन ठेवून शेती करत आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी विक्रीसाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागले. मात्र आता ग्राहक स्वतःहून संपर्क साधत आहेत. गृहोद्योगातून विविध प्रकारची पिठे, लोणची, सांडगी मिरची, आंबा, फळस पोळी, कोकम तयार करून विकतो. याशिवाय बारमाही ओला चारा उपलब्ध होत असल्याने दुग्धोत्पादनही चांगले होत आहे. असे शेतकरी विनायक केळकर यांनी शेवटी म्हटले आहे.