हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीची वाट (Success Story) धरत आहे. विशेष म्हणजे हे तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत, आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे. ज्यामुळे या तरुण शेतकऱ्यांना शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर दोन एकरवरील केशर आंबा लागवडीतून ८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात (Success Story) त्यांनी ही किमया करून दाखवल्याने, त्यांची सध्या सर्वीकडे चर्चा होत आहे.
पारंपारिक पिकांना मूठमाती (Success Story Of Mango Farming)
सावनकुमार तागड असे या तरुण शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, ते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरापूर गावचे रहिवासी आहेत. शेतकरी सावनकुमार तागड हे उच्चशिक्षित असून, नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची वाट धरली आहे. त्यांनी आपले एमएबीएडपर्यंत शिक्षण पुर्ण केले आहे. सुरुवातीला शेती करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या शेतीमध्ये पारंपारिक पिके घेतली जात होती. मात्र, सावनकुमार तागड यांनी कापूस, तूर, कांदा या पारंपारिक पिकांना मूठमाती देत फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध अशा केशर आंब्याची लागवड करण्याचा निर्धार केला.
नैसर्गिक संकटांमुळे फटका
शेतकरी सावनकुमार तागड सांगतात, केशर आंबा लागवड करण्याचे निश्चित झाल्यानंतर 2019 मध्ये आपण बीड येथील नर्सरीतून 400 केशर आंब्याची रोपे आणली. या काळात अनेक संकटे आली. पण योग्य नियोजन आणि कृषी सल्ला घेत आपण केशर आंब्याची बाग फुलवली. यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. गेल्या तीन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. ज्यामुळे यंदा उत्पादनात काहीसा फटका सहन करावा लागला आहे.
किती मिळाले उत्पन्न?
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीस येत आहे. शेतकरी तागड यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि गवतात नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवून ग्राहकांना विकतात. त्यांनी घरीच शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री सुरू केली आहे. गेल्या वर्षी त्यांना आंबा बागेतून पहिल्याच वर्षीच्या फळातून एकूण 4 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. तर यंदा दुसऱ्या वर्षात फळ विक्रीला आले असून, यंदा संपूर्ण आंबा हंगामात एकूण 8 लाख रुपये उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा असल्याचे शेतकरी सावनकुमार तागड सांगतात.